Loading...

2025-2026 साठी प्रवेश देणे चालू आहे

सुविधा आणि सुरक्षा

शाळेत विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित RO पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, कॅमेरा सुरक्षेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी बसवलेले आहेत.स्वच्छतागृहांची स्वच्छता आणि सुंदरता कायम ठेवली जाते.

स्पर्धा परीक्षा तयारी

विद्यार्थ्यांची स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयारी उत्तम प्रकारे करण्यात येते. नवोदय, स्कॉलरशिप, सातारा सैनिक स्कूल या परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन दिले जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात यश मिळवण्याची संधी मिळते.

प्रथम ते सातव्या इयत्ता विद्यार्थ्यांचा अभ्यास

संत ज्ञानेश्वर माऊली प्रा. विद्यालयात नर्सरी, LKG, UKG पासून ते इयत्ता 7वी पर्यंतचे वर्ग आहेत. प्रत्येक वर्गात जास्तीत जास्त 30 विद्यार्थी ठेवले जातात, ज्यामुळे गुणवत्ता शिक्षण मिळते.

उपक्रम आणि स्पर्धा

शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लेझीम, हलगी, स्काउट-गाईड इत्यादी उपक्रम राबवले जातात. विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि खेळांच्या स्पर्धांमध्ये विद्यार्थी सहभाग घेतात, ज्यामुळे त्यांच्या नेतृत्वगुणांचा विकास होतो.

About Us

'बाल देवो भव'

उदगीर व परिसरातील एक गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्र म्हणून ओळखली जाणारी शाळा म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक विद्यालय. गेल्या 25 वर्षांपासून अविरतपणे कार्यरत असलेल्या या शाळेत नर्सरी, LKG, UKG पासून ते इयत्ता 7वी पर्यंत सेमी-मराठी माध्यमाचे शिक्षण दिले जाते. इतर शाळांपेक्षा ही शाळा वेगळी ठरण्याचे कारण म्हणजे येथे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केलेल्या अनेक भौतिक सुविधा. शाळेत विद्यार्थ्यांना अभ्यासाचे दृढीकरण लवकर व्हावे म्हणून प्रोजेक्टरच्या साहाय्याने शिक्षण दिले जाते. तसेच, विद्यार्थ्यांच्या वाचन गुणांचा विकास व्हावा म्हणून ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली आहे. ग्रंथालयातील विविध पुस्तकांमधून विद्यार्थ्यांना नवनवीन माहिती मिळते. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शाळेत RO पाण्याची सुविधा उपलब्ध आहे, जे शुद्ध आणि निरोगी आहे. मध्यांतरात विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. या आहारामध्ये केळी, अंडी, राजगीरा लाडू इत्यादी पौष्टिक पदार्थांचा समावेश असतो. शाळेत विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ आणि सुंदर असे स्वच्छता रूम आहेत. प्रत्येक वर्गात स्वच्छ, सुंदर डेस्क, फॅन, लाईट आणि मोठ्या खिडक्या आहेत, ज्यामुळे वर्ग प्रकाशमय आणि हवादार आहेत. शाळेत विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा राबविल्या जातात, ज्याचा उपयोग विद्यार्थ्यांना भविष्यात होणाऱ्या स्पर्धांसाठी होतो. पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय, स्कॉलरशिप, सातारा सैनिक स्कूल या परीक्षांची उत्तम तयारी शाळेतच करून घेतली जाते. दरवर्षी अनेक विद्यार्थी राज्यस्तरीय, विभागीय, जिल्हा आणि तालुका स्तरावर यश मिळवतात.

बालवाडी ते सातवी वर्गापर्यंत सेमी-मराठी माध्यमाचे विशेष वर्ग आहेत. प्रत्येक वर्गात जास्तीत जास्त 30 विद्यार्थी ठेवले जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्ता मिळते. शाळेत दररोज सकाळी संगीताच्या सुरावटीतून परिपाठाची सुरुवात होते. परिपाठात देशभक्तीपर गीते, संस्कृतिक, धार्मिक मंत्र यांचा समावेश असतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. दर आठवड्यात दोन दिवस सामान्य ज्ञान, बोधकथा सांगितल्या जातात, ज्याचा विद्यार्थ्यांना भविष्यात खूप उपयोग होतो. शाळा उदगीर नगरीत होणाऱ्या प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेते. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांतून बक्षिसे मिळवली आहेत. शाळेत विविध खेळांचे आयोजन केले जाते, ज्यामुळे विद्यार्थी जिल्हा, तालुका, विभाग आणि राज्यस्तरावर यश संपादन करतात. विद्यार्थ्यांना लेझीम, हलगी, स्काउट-गाईड यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून परिपूर्ण बनवण्याचा प्रयत्न केला जातो. शाळेत वैज्ञानिक प्रयोगांचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित केला जातो. शाळेत विद्यार्थ्यांचा बौद्धिक, सामाजिक तसेच सर्वच बाजूंनी विकास होत असल्याने दरवर्षी शाळेतून शिकलेले अनेक विद्यार्थी उत्तम पदांवर पोहचले आहेत. संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक विद्यालय ही शाळा केवळ शिक्षण पुरवणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी खेळांची उत्तम व्यवस्था केली आहे. मैदानावर खेळताना विद्यार्थ्यांना संघभावना, शिस्त आणि नेतृत्वगुण शिकण्याची संधी मिळते. खेळाच्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी शाळेचा नावलौकिक वाढवला आहे. शाळेतील शिक्षक वर्ग अत्यंत कुशल व विद्यार्थ्यांप्रति तितकेच कर्तव्यदक्ष आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याच्या वैयक्तिक प्रगतीकडे बारकाईने लक्ष दिले जाते. शाळेने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. संगणक कक्षेतून विद्यार्थ्यांना संगणकाचे मूलभूत ज्ञान दिले जाते, ज्यामुळे ते आधुनिक जगाशी सुसंगत राहतात. शाळेत दरवर्षी विविध उत्सव, कार्यक्रम साजरे केले जातात, ज्यातून विद्यार्थ्यांना सांस्कृतिक व सामाजिक मूल्यांचे महत्त्व पटते. गणेशोत्सव, स्वतंत्रता दिन, शिक्षक दिन अशा विविध प्रसंगी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमांनी शाळेचा परिसर आनंदमय होतो. संत ज्ञानेश्वर माऊली प्रा. विद्यालय उदगीर नगरीतील गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणून ओळखली जाते. शाळेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले प्रयत्न हे निःसंशयपणे उल्लेखनीय आहेत. यामुळेच दरवर्षी अनेक विद्यार्थी उच्च पदांवर पोहचत आहेत आणि शाळेचे नाव उज्ज्वल करत आहेत.

संस्थापकांचे मनोगत

'बाल देवो भव'

श्री संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक विद्यामंदिरची वेबसाईट सुरू करताना माझ्या हृदयात असंख्य भावना दाटून येतात. थोडं मागे वळून पाहताना, माझं शिक्षण कसं सुरु झालं आणि या शाळेची स्थापना कशी झाली, हे सांगणं मला महत्त्वाचं वाटतं. मी इयत्ता ५ वी मध्ये असतानाही पुस्तकं वाचू शकत नव्हतो. मात्र, माझ्या आजोबांनी केवळ एका वर्षात मला वाचन शिकवून वाचनाची गोडी निर्माण केली. त्यांनी मला 'ज्ञानेश्वरी' सारखा विश्वकल्याणकारी ग्रंथ वाचायला शिकवला. त्यामुळे माझ्या मनात माऊली महाविष्णुसंत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांबद्दल अपार श्रद्धा, प्रेम, आपुलकी, आणि जिव्हाळा निर्माण झाला. आजोबांचा स्वर्गवास झाल्यानंतर, माझे वडील मला मंदिरामध्ये पोथीवाचनासाठी घेऊन जात असत. त्यामुळे माझे अंतःकरण माऊलीप्रती आणि संतांप्रती संवेदनशील झाले. या प्रेरणेतूनच संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक विद्यामंदिराची स्थापना झाली. ही शाळा पारंपारिक शाळा नसून प्रत्येक विद्यार्थी हा संयभू असतो.

प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य संस्कार आणि संधी उपलब्ध करून दिल्यास, तो स्वावलंबी होऊन माऊलींसारखं विश्वशांती व विश्वकल्याणाचं काम करू शकतो, असा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे, १९९९ साली या शाळेची स्थापना केली. चालू वर्ष हे शाळेचं रौप्यमहोत्सवी वर्ष (१९९९-२०२४) आहे. या वर्षात, शाळेला डिजिटल करण्याचं स्वप्न आम्ही पाहिलं आहे. माऊलींनी म्हटल्याप्रमाणे "इवलासा वेलू गेला गगनावरी" हे भव्य स्वप्न साकार करण्यासाठी, संस्थाचालक, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी, दानशूर व्यक्ती, आणि शासनाच्या विविध उपक्रमांच्या मदतीने संपूर्ण शाळा डिजिटल केली जात आहे. या प्रकल्पासाठी जवळपास १० कोटी रुपये खर्च येत आहे. आम्हाला आशा आहे की माऊलीच्या कृपेने, "जो जे वांचिल तो ते लाहो!" या उक्तीप्रमाणे, आपणा सर्वांच्या प्रेमाची, सहकार्याची आणि आर्थिक मदतीची गरज आहे. आम्हाला खात्री आहे की आपल्या सहकार्याने आणि माऊलींच्या आशीर्वादाने, आम्ही हे स्वप्न नक्कीच साकार करू. ही शाळा प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन आणि संधी देईल, ज्यामुळे ते भविष्यातील उज्वल कर्तृत्व गाठू शकतील.

श्री संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक विद्यामंदिरच्या वेबसाईटच्या उद्घाटनाच्या निमित्ताने काही ठळक उपक्रम राबविण्याचे आम्ही ठरवले आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

ठळक उपक्रम:

भव्य क्रीडांगण: चार एकर परिसरात भव्य क्रीडांगण तयार करणे, जेथे विद्यार्थ्यांना विविध खेळ खेळता येतील.

वर्ग खोल्यांची आणि प्रशासकीय इमारतींची उभारणी: प्रत्येक वर्गखोली आणि इतर प्रशासकीय इमारती प्रोजेक्टर आणि ए/सी सुविधांसह तयार करणे.

अत्याधुनिक ग्रंथालय: अत्याधुनिक भव्य असे कॉम्प्युटराईज्ड ग्रंथालय उभे करणे, जे अत्याधिक वेगवान इंटरनेटसह असेल.

समृद्ध निवास व्यवस्था: विद्यार्थ्यांसाठी समृद्ध निवास व्यवस्था आणि त्यांना आरोग्यसंपन्न व बलवान बनविण्यासाठी योग्य आहार (मिलेटसह) उपलब्ध करणे.

२४ तास खुली अभ्यासिका: परिसरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी २४ तास खुली अभ्यासिका निर्माण करणे.

स्वतंत्र प्रयोगशाळा: प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा सुरू करणे.

संगणकीय प्रयोगशाळा: अत्याधुनिक संगणकीय प्रयोगशाळा तयार करणे.

खगोलशास्त्राचा अनुभव: खगोलशास्त्राचा प्रत्यक्ष आकाशदर्शन घडविणे आणि अत्याधुनिक दुर्बिण व्यवस्था उपलब्ध करणे.

उत्कृष्ट बगीचा: उत्कृष्ट बगीचा निर्माण करणे, ज्यामुळे परिसरातील वातावरण सुंदर आणि ताजेतवाने होईल.

अध्यात्मिक संस्कार: वैदिक यज्ञ, पूजापाठ, प्रार्थना स्थळ अशा अध्यात्मिक संस्कारांसाठी सुविधा निर्माण करणे.